Ticker

6/recent/ticker-posts

सौभाग्य, समृद्धी आणि श्रद्धेचा जागर : महालक्ष्मी



अकोला : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात घराघरांत भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा सुगंध दरवळत असताना अकोला-कोथळी खुर्द येथील गोदावरी पुरुषोत्तम गिऱ्हे यांच्या घरी महालक्ष्मीचे विधिवत आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करून गिऱ्हे कुटुंबीयांनी भक्तिभावाने पूजन केले. या निमित्ताने संपूर्ण घरात प्रसन्न, आनंदी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

महालक्ष्मीच्या आगमनासाठी घराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची आरास, रांगोळी, दीपमाळ तसेच विविध सजावटीच्या माध्यमातून परिसराला सुंदर रूप देण्यात आले. महालक्ष्मीच्या पूजेसाठी विविध नैवेद्य, फळे व पूजेचे साहित्य सजविण्यात आले होते. विधिवत पूजा, आरती व मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

महालक्ष्मीचे आगमन हे गिऱ्हे कुटुंबीयांच्या श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक ठरले. या मंगलप्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवाराने उपस्थित राहून महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि गिऱ्हे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

महालक्ष्मीच्या कृपेने गिऱ्हे कुटुंबीयांच्या घरी सदैव सुख, समृद्