बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागनाथवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. निकिता धीरज फडतरे यांची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीत माजी जि.प.सदस्य विठ्ठलराव फडतरे गटाचे सरपंचासह सदस्यांचे बहुमत असल्याने अंतर्गत ठरावानुसार सौ.निकिता फडतरे यांना सर्वानुमते संधी देण्यात आली. तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री राहुलबाबा फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत,सरपंच श्री स्वप्नील तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निरीक्षक मंडळ अधिकारी श्री. सचिन कर्णे व ग्रामअधिकारी श्री. संतोष माळवे यांनी काम पाहिले. उपसरपंचपदासाठी सौ.फडतरे यांचा एकमेव अर्ज आला. अनुमोदन माजी उपसरपंच विकास विठ्ठलराव घाडगे यांनी दिले.
नवनियुक्त उपसरपंच सौ.फडतरे यांचे ग्रामविकास पंचायतराजमंत्री ना.जयकुमार गोरे,कृष्णाखोरे विकास महामंडळचे उपाध्यक्ष ना.महेशदादा शिंदे, प्रभाकर घार्गे,तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुलबाबा फडतरे,मा.जि.प.सदस्य मानाजीराव घाडगे,रंगराव फडतरे,प्रभाकर घाडगे,मोहन जगताप,शेखर फडतरे,अर्जुन फडतरे,सुनील घाडगे,कृष्णात खापे,प्रदीप फडतरे,शिवाजी गुरव,विजय जगताप,मोहन तांबे,शत्रुघ्न जगताप,अशोक गुरव,अरुण शेडगे,विजय फडतरे प्रकाश घाडगे,नामदेव शिरतोडे,रणजीत शिरतोडे,गणपत फडतरे,सर्व सदस्य ग्रामस्थ,पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Social Plugin