Ticker

6/recent/ticker-posts

अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाईप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 


दोन आयशर ट्रक आणि फोर व्हिलरसह तिघांना अटक ४३ लाख ३९ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त

सैय्यद मज़हर अली @ अकोट प्रतिनिधी

अकोट १५/०९/२०२६

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पोपटखेड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवलेले लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळीचा अकोट ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १४ सप्टेंबरच्या रात्री अकोली जहांगीर फाटा येथे गस्त घालत असताना पोलिसांनी दोन आयशर ट्रकमधून पाईप नेत असल्याचे पकडले.

तपासणीअंती हे पाईप चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ३९ हजार २२८ रुपये किमतीचे ८२ पाईप, दोन आयशर ट्रक व एक चारचाकी असा एकूण ४३ लाख ३९ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ट्रक चालक मनीष मॅन, कपिल दुधे (दोन्ही रा. वर्धा) आणि सूत्रधार प्रभाकर भताने (रा. लातूर) या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.