पोंभूर्णा तालुका प्रतिनिधि, अमीन मेश्राम
दिन,17/09/2026पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील दुर्दैवी घटना पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातून काम आटोपून घरी परतत असताना अचानक वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, केशव डोनु गुडी (वय ५५ वर्षे) हे पत्नी वैशाली केशव गुडी (वय ४५ वर्षे) यांच्यासह शेतातून काम पूर्ण करून घरी परतत होते.
दरम्यान, ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत केशव गुडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नी वैशाली गुडी गंभीर जखमी झाल्या. जखमी वैशाली गुडी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, पोंभूर्णा येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे चेकठाणेवासना गावात हळहळ व्यक्त होत आहे.





Social Plugin