प्रतिनिधी जिवन साळवे )
सिंदखेडराजा : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील गैरकारभार आणि यापूर्वी सादर केलेल्या पक्षपाती अहवालाची फेरचौकशी व्हावी, या मागणीसाठी गजानन कहाळे, बबन हरिभाऊ सरकटे व दिपक म्हस्के यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून(ADHO) यांनी चौकशीत चुकीचा खोटा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करुन संशयितांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत तक्रारदारांनी येत्या १२ ऑक्टोबर २०२६ पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील गैरकारभार, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद असणे, यासंदर्भात तक्रारदार गजानन बाबुराव कहाळे यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी वरिष्ठाकडे अपील अर्ज दाखल केला होता. मात्र, यापूर्वीच्या चौकशी अधिकाऱ्याने जीपीएस पुरावे व प्रत्यक्ष वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून दोषींना वाचवण्यासाठी बनावट अहवाल तयार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या अयोग्य अहवालावर १५ दिवसांत फेरचौकशी करून
कारवाई न झाल्याने आता उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे. तात्कालीन चौकशी अधिकाऱ्याचा खोटा व पक्षपाती अहवाल त्वरित रद्द करण्यात यावा. दुसऱ्या सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मार्फत निष्पक्ष फेरचौकशी व्हावी. दोषी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कडक कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अन्याय होत असल्याचे सांगत, तक्रारदार गजानन कहाळे, बबन हरिभाऊ सरकटे व दिपक म्हस्के यांनी बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस दिली आहे





Social Plugin