Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय शाह समाज महासभा यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात "शाह समाज जोडो" आंदोलन

 

१ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन.!!

मन्सूर शहा चिखली, धोत्रा भंनगोजी : (महाराष्ट्र ग्रामीण न्यूज).:---

राष्ट्रीय शाह समाज महासभेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात 'शाह समाज जोडो अभियान' राबविण्यात येणार आहे. संघटक प्रमुख के. जी. शाह यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान होणार असून जिल्हा प्रमुख शाहिद शाह व महासचिव मन्सूर शाह यांच्या देखरेखीखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात 'समाज तेथे शाखा' हा उपक्रम राबविण्यासह शाह समाज भूषण पुरस्कार वितरण, समाजाची जनगणना, तसेच छप्परबंद जात प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत जिल्हाव्यापी व राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबतच शाह समाज सामूहिक विवाह सोहळा, शैक्षणिक जनजागृती अभियान, विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा यांसह विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय शाह समाज महासभेच्या वतीने देण्यात आली.

या अभियानात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
9604214400, 9561918760, 9371724309, 9527839817