प्रतिनिधी अनिकेत चांदणे
उरळ : पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम स्वरूपखेड येथून अवैधरीत्या विना परवाना गौणखनिज उत्खनन करून वाळूची चोरी व वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध उरळ पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र खंडारे (वय २६), रा. तळोडा, ता. शेगाव, जि. बुलढाणा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन ब्रास वाळू, अंदाजे किंमत ₹१०,०००, तसेच अवैधरीत्या विना परवाना वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH-30 BD-6199, अंदाजे किंमत ₹५ लाख, असा एकूण ₹५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध उरळ पोलीस स्टेशन अप. नं. ३३३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन (बाळापूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सपोनि जनार्दन खंडेराव ताणेकर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ नागेश बाबूळकर, पोहेकॉ विजय चव्हाण, पो.कॉ. सुरेश भारसाकळे व पो.कॉ. उमेश वाकोडे यांनी ही कारवाई केली.





Social Plugin