Ticker

6/recent/ticker-posts

हरबळ ग्रामपंचायतीत जयंतीनिमित्त ग्रामसभा; मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थ नाराज

 


गजानन शिंदे |ग्रामीण प्रतिनिधी  हरबळ, 

लोहा तालुक्यातील हरबळ ग्रामपंचायतीच्या वतीने जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विविध प्रश्न व विकासकामांवर चर्चा करण्यात आली. मात्र, मागील ग्रामसभेत ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावातील नाली सफाई, स्वच्छता, फवारणी, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत मागील ग्रामसभेत मागण्या करण्यात आल्या होत्या. संबंधित मागण्यांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेत नागरिकांनी आपल्या समस्या मांडत प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून गावातील विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली.या वेळ प्रसंगी संदीप शिंदे,रामपूर शिंदे, केरबा पा. शिंदे (रोजगार सेवक )ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत चे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.