Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या कष्टाचे स्वप्न पूर्ण

प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव 

चाळीसगाव पाटणादेवी रोड विजयसिंह नगर मधील राहणाऱ्या आईचे स्वप्न मुलाने केले पूर्ण वडिलांचे निधन झाल्यावर प्रथमेश हा त्यावेळी १६ वर्षाचा होता तो आईबरोबर शेती काम करू लागला त्याची आई शेती काम करून भाजीपाला पण विकत असायची वडिलांच्या निधन नंतर प्रथमेश वर जबाबदारी पडली व आई घाबरून न जाता प्रथमेश ला शाळा शिकून मोठे केले पण तो सुद्धा जिद्दी होता

 त्याने आईच्या कष्टाला फळ मिळून दिले व त्याच्या मोठ्या काकांनी व दोन नंबर काकांनी पण त्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला व त्याचा मित्र कै. शुभम भाऊ आगोणे याने प्रथमेशला भरती होण्यासाठी सर्वात जास्त मदत केली म्हणून आज प्रथमेश बोरसे यांनी मेहनती सह चिकाटीने खाकी वर्दी मिळवली व आज तो मुंबई मीरा भाईंदर पोलीस खात्यात त्याची निवड झाली या बद्दल परिसरातील नागरिकांसह शुभम मित्र परिवाराने आनंद व्यक्त करून कौतुक केले आहे. व आज सर्व समाज बांधवांनी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर चौकात प्रथमेश चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.