बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता . खटाव येथील सौ . उषा महादेव गायकवाड [वय ५५ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . बुध विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन महादेव जयवंतराव गायकवाड यांच्या पत्नी व सहयाद्री संघटनेचे युवानेते केतन गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत्या .
त्यांच्या पाठीमागे पती , मुलगा , दोन मुली , सुना , नातवंडे , दिर , जाऊ असा मोठा परिवार आहे . त्यांच्या निधनामुळे बुध येथे हळहळ व्यक्त करण्यात आली . त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . बुधवार दि१० रोजी सकाळी ८ .३० वाजता सावडण्याचा विधी बुध येथे होणार आहे .
Social Plugin