चार चार वेळा कागदपत्रे देऊन ही केवायसी होत नाही - लाडकी बहिण
प्रतिनिधी: सोमनाथ निंबारे
ठाणापाडा | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणी त्रस्त होऊन केवीलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठाणापाडा परिसरातील लाडक्या बहिणी सह आजी-आजोबा तसेच विद्यार्थ्यांना केवायसी साठी बॅंकेत चार चार वेळा चकरा माराव्या लागतात आणि प्रत्येक वेळी केवायसी साठी कागदपत्रे देऊन ही केवायसी होत नसल्यामुळे लाडक्या बहिणी त्रस्त झाल्या आहेत. असे बॅंक खातेदारांकडून समजले. यावेळी एका पेक्षा जास्त मनुष्यबळ केवायसी साठी वाढविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.





Social Plugin