बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]:
'दारू नको, दूध प्या', 'द नाही दारूचा, द दुधाचा' अशा घोषणा देत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना दूध वाटप करत परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, सातारा आणि सर्वोदय सामाजिक संस्था, काटेवाडी यांच्या वतीने 'नववर्षांचे स्वागत दारू पिऊन नको,' असा संदेश दिला गेला. यावेळी एक स्वाक्षरी व्यसनमुक्तीसाठी अभियान राबविण्यात आले. पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नववर्षाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयीन युवक-युवती व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नव्या वर्षाचे स्वागत क्षणभंगूर आणि आरोग्यास घातक अशी दारू प्राशन करून करण्याऐवजी दूध प्रशनाने करा, असा संदेश देत समाजाला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या हेतूने हा अनोखा उपक्रम आयोजित केल्याचे व्यसनमुक्ती तज्ज्ञ किशोर साळुंखे यांनी सांगितले. मानोसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे - सर्वोदयी, डॉ. संदीप माळी आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.





Social Plugin