बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत खटाव तालुक्यातील वेटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अव्वल ठरली.वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.संचिता दत्तात्रय नलवडे हिने लहान गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर हस्ताक्षर स्पर्धेत कु.प्रांजल सुरज नलवडे हिने लहान गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच सुधाकर देवकर,उपसरपंच महेश नलवडे,सर्व ग्रा.पं. सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद नलवडे,सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते मॅडम,विस्ताराअधिकारी संगीता गायकवाड मॅडम, केंद्रप्रमुख अजित निकाळजे, साहेब यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक संग्राम जाधव,शिक्षिका शोभा माळवदकर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.





Social Plugin