Ticker

6/recent/ticker-posts

देपुळ येथे भगवान बाबा पुण्यतिथी निमित्ताने ह.भ.प.फड साहेबांचे किर्तन संपन्न



प्रतिनिधी संजय भरदुक 

७ जानेवारी रोजी ह. भ. प. ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड ( आय. ए. एस.) छत्रपती संभाजी नगर,यांचे मौजे देपुळ ता. जि. वाशीम येथे झालेले किर्तन. 

       यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्त पुर्णपणे शेवटपर्यंत एकाग्र व तल्लीन झालेले दिसुन आले. आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांनी मौजे देपुळ नगरात आजपर्यंत असे किर्तन झाले नाही असे बोलून दाखविले. 

       हा योग श्री. माणिकराव गंगावणे सर यांनी घडवून आणला यावेळी युवा वर्ग, महिला व पुरुष यांना आगळे वेगळे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आनंदीत झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय तथा आसेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. इंगळे साहेब व स्टाॅप सुद्धा आवर्जून उपस्थित होते.