बुध दि .[प्रतिनिधी ]
दि ०६ जानेवारी हा दिवस 'मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका पत्रकार संघ कार्याध्यक्षपदी श्री. प्रकाश राजेघाटगे यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी.भोसले यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री प्रकाश राजेघाटगे म्हणाले,'पत्रकारिता ही लोकशाही व्यवस्थेतील चौथा स्तंभ असून समाज प्रबोधन घडवून आणण्यास मोलाचा वाटा आहे असे सांगितले . प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद डॉ. संजय क्षीरसागर म्हणाले, वृत्तपत्रे ही समाज प्रबोधनाच्या प्रवासात सर्वात समर्थ माध्यम म्हणून वृत्तपत्राचे महत्त्वाचे योगदान आहे. महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले,'वृत्तपत्र ही लोकविश्वासात उतरलेली आहे लोकशिक्षणाचे काम करत असताना समाज परिवर्तनाचे काम वृत्तपत्र करत असतात समाजाच्या विकासात पत्रकारितेला महत्त्वाचे मानले जाते .
श्री विलास कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाले डिजिटल युगामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअरला खूप संधी आहे विद्यार्थ्यांनी संधीचा घेतला पाहिजे असे सांगितले प्रा.किरण देशमुख यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारितेविषयी माहिती सांगितली. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार प्रकाश राजेघाटगे ,श्री विलास कुलकर्णी ,श्री. किरण देशमुख या पत्रकारांचा प्राचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.एच.जी.निमसे यांनी केले. प्रा.वाघमारे एस. डी. सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.





Social Plugin