बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे समृद्धी कारखान्याकडून जोमात ऊस तोडणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील हे शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी स्वतः लक्ष घालून मदत करत असल्याचे चर्चा सध्या येथे आहे. समृद्धी कारखान्याकडून घुंगर्डे हादगाव येथे मशीनद्वारे ऊस तोडणी जोरात सुरू आहे.
या कामासाठी स्वतः समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील हे गोरगरीब जनतेच्या उसासाठी सहकार्य करत आहेत. या कामी या कारखान्याची कर्मचारी व ऊस पुरवठा अधिकारी शेख जावेद, ज्ञानेश्वर घोडके, संतोष काकडे, परमेश्वर मोरे, योगेश गव्हाणे, खरात, आदी कर्मचारी सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी मदत करत असल्याचे चित्र दिसत आहे.





Social Plugin