जिल्हा परिषद शाळा बुधमधील चिमुकल्यांचा बाजार उत्साहात
बुध , दि. (प्रकाश राजेघाटगे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुध, ता. खटाव येथे बालबाजार भरवण्यात आला, बाजार लहानग्यांचा आणि खरेदी मोठ्यांची होती. या बाल बाजारात विद्याथ्यांनी पालेभाज्या, भेळ, पाणीपुरी, शेंगा, कांदा, खेळणी, स्टेशनरी साहित्याची दुकाने थाटली होती. या बालबाजारात ४१३०० रूपयांची उलाढाल झाली .
बाजाराचे उद्घाटन सरपंच सौ . सुजाता बोराटे , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , माजी प्राचार्य के .डी. पवार , ग्रामपंचायत सदस्य जयवंत जगदाळे , राजुल बोराटे , शशिकांत घाटगे , गणेश सातपुते , सागर जाधव , राहुल कदम , शिवाजी देसाई , , शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन सुतार , उपाध्यक्षा सौ श्रद्धा पवार , हुसेन पठाण , सुमित कुंभार , वैभव सुर्यवंशी , किर्ती बल्लाळ , स्नेहल जगदाळे , अंजुम मोमीन , सुप्रिया शेंडे , दयानंद जगदाळे , विकास सुतार , सौ . खराटे प्रिती त्रिपुटे , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते. गावातील महिलांनी खरेदीचा आनंद घेतला, ग्रामस्थांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे बाजार गजबजलेला होता, लहान मुलांना आर्थिक गणित समजणे गरजेचे आहे. तसेच त्यांना अभ्यासाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही प्रकारच्या अडचणोंना सामोरे जाताना कमीपणा भासत नाही. तसेच शाळेने जिल्हयातील शाळेसमोर नवा आदर्श ठेवला आहे. जिल्ह्यातील शाळांनी असा नवीन प्रयोग करावा, असे आवाहन सरपंच सुजाता बोराटे यांनी केले. बाल बाजार उपक्रमामुळे सर्व मुलांच्या व्यवहार ज्ञानात भर पडेल. अशा उपक्रमामुळे पालकवर्गही शाळेत येऊ लागले आहेत. अशा उपक्रमांतून शाळेच्या प्रगतीचा आलेख उंच जात राहिल, असा विश्वास माजी प्राचार्य के .डी. पवार यांनी व्यक्त केला. सर्व मुला-मुलांनी स्वतःच्या घरी पिकणाऱ्या पालेभाज्या, केळी, कांदे, शेंगा, अशा निवड वस्तू आणल्यामुळे बाजारात सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. समाज संपर्क शेती व शेतकरी यांच्याविषयी प्रेम वाढावे व स्वतः अर्थार्जन करावे, हा उद्देश या आयोजनातून साध्य झाला असल्याचे मुख्याध्यापक जयवंत घाडगे यांनी सांगितले . यावेळी माजी सरपंच बाळासाहेब इंगळे , विजय सुर्यवंशी , राजेंद्र कचरे , डॉ . राजेश खोत , वैभव लोहार , राजेंद्र |त्रिपुटे , केंद्र प्रमुख अजित निकाळजे , नितीन खोत , व पालक , ग्रामस्थ उपस्थित होते . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जयवंत घाडगे , माधुरी नलवडे ,जितेंद्र जगताप ,दत्तात्रय जाधव , दमयंती अब्दागिरे , उमा रणसिंग , नितीन घनवट , संग्राम कांबळे , अनिता मोरे यांनी परिश्रम घेतले . . चौकट :यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी प्रकाश राजेघाटगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक जयवंत घाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .





Social Plugin