बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
कला व वाणिज्य महाविद्यालयात एक जानेवारी ते १५जानेवारी २०२५ वाचन पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे. याच उपक्रमाचा एक भाग भाग म्हणून महाविद्यालयातील ज्ञानस्तोत्र (ग्रंथालय विभाग) व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, व भाषा विभाग यांच्या वतीनं वाचन हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. महामानवाच्या चरित्र ग्रंथाचे वाचन करावे व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व विकासामध्ये वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते त्यामुळे अवांतर वाचनामुळे आपणास दररोज नवनवीन माहिती सहजरीत्या उपलब्ध होत असते आपले ज्ञान आणि आपली भाषा समृद्ध होण्यासाठी आज वाचन संस्कृतीचे जतन केले पाहिजे असे सांगितले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. के .जी.कुंभार म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञान आधारित वाचन कौशल्य व माहिती आत्मसात केली पाहिजे ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या ग्रंथालयापासून वाचनाची प्रेरणा मिळत असते प्रसिद्ध लेखक समाज सुधारक यांच्या चरित्राचे वाचन केले पाहिजे प्रसंगी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे सामूहिक वाचन केले .महाविद्यालयाच्या सभागृहात सामूहिक वाचन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin