प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
शहरातील हिरापूर रोडवरील ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीची निवड करण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी मुकेश प्रतापगिरी गोसावी, उपाध्यक्षपदी शिल्पा क्षितिज जामनेरकर यांची निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा संघटकपदी ज्येष्ठ पत्रकार आर.डी.चौधरी, चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी प्रा.डॉ.आर.पी. निकम, चाळीसगाव शहराध्यक्षपदी पत्रकार रामलाल चौधरी, महिला शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या कविता साळवे, उपशहराध्यक्षपदी उमेश भास्करराव आगवणे,उपतालुकापदी किसन दिलीप चौधरी, विभाग प्रमुखपदी नीरज पांडुरंग ठाकूर यांची निवड करण्यात आली. यावेळी मुकेश गोसावी, शिल्पा जामनेरकर, पत्रकार आर.डी. चौधरी, प्रा.राजू निकम, पत्रकार रामलाल चौधरी, इस्माईल कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीस प्रा.पाटे, सविता कुमावत, फकीरा खान, रमेश बैरागी आदी मान्यवर उपस्थित होते. नियुक्त झालेल्या सर्व मान्यवरांचे अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.





Social Plugin