Ticker

6/recent/ticker-posts

धुळे जिल्हयातील शेतकरी शेतरस्त्यापासून वंचित राहू देणार नाही -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



*धुळे जिल्ह्यातील तहसिलदारांना शिव पानंद शेतरस्ते मोकळे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश. 

 

मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.

 सरकार बदलते शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावनी होत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन शेतकर्‍यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय ,न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा,जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा,नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा, शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या,प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा,शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी ,विभाजन शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे

 त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात धुळे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी,शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात यासंदर्भाचे निवेदन धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिले असता जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेत तातडीने जिल्ह्यातील शिवपानंद शेतरस्ते खुले करण्याचे आश्वासन दिले शब्द न पाळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन करण्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्यसमन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी निवेदनात म्हटले असुन अनुचित प्रकार घडल्यास शासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांकडे शेतकऱ्यांनी दिले असता त्यांनी तातडीने धुळे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांना सुचना काढण्याचे आश्वासन दिले प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या चळवळीच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी निवेदन देताना धुळे जिल्हा चळवळीचे प्रमुख गुणवंत पवार बेटावद,संजय कलेश्वर बच्छाव दहिवेल,दीपक जगताप,शामराव पाटील, गुलाब पाटील,अमृत पवार संतोष खैरनार, दिलीप पाटील, शांतीलाल पाटील,मंगेश सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते ग्रामसमृद्धीसाठी शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांनासांगितले.