सिंदखेड राजा :-
बहुजन साहित्य संघ नियोजित 2025 साहित्य संमेलन संदर्भात व व्यवस्थापन यावर मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे दैनिक लोकनेता कार्यालय परिसरात महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक, स्वागत अध्यक्ष, प्रमुख अतिथी, ग्रंथ दिंडी उद्घाटक, प्रमुख अतिथी, रांगोळी उद्घाटक, प्रमुख अतिथी, संमेलन उद्घाटक, स्वागत, पुरस्कार वितरण, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष, प्रमुख अतिथी, परिसंवाद अध्यक्ष, प्रमुख अतिथी, कवी संमेलन अध्यक्ष, प्रमुख अतिथी, कथाकथन अध्यक्ष, प्रमुख अतिथी व सहभाग विषय- 01) संविधान 02) ऐतिहासिक वारसा जतन 03)लोणार सरोवर आणि पर्यटन, निमंत्रित कवी व समारोप अध्यक्ष, प्रमुख अतिथी व आभार प्रदर्शन. हे कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे बसाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे चिखली यांनी जाहीर केले.
तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापना संदर्भात देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यामध्ये 01 स्वागत समिती 02 स्टेज साऊंड सिस्टम 03 फोटोग्राफी व व्हिडिओ 04 ग्रंथदिंडी वाद्यवृंद व्यवस्थापन 05 रांगोळी व चित्र प्रदर्शनी 06 सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन 07 उद्घाटक व पुरस्कार व्यवस्थापन 08 भोजन नाष्टा 09 चहापाणी 10 स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र 11 फेटे व बिल्ला व्यवस्थापन 12 बॅनर 13 निवास व्यवस्थापन 14 सभागृह 15 स्टेशनरी 16 स्टेज डेकोरेशन या व्यवस्थापनातील बाबी असून या गोष्टींचे नियोजन आपल्याला करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
सदरील बैठक पत्रकार राहुल झोटे, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यांनी उपरोक्त विषया संदर्भात तसेच संमेलन व्यवस्थेसाठी व्यवस्थापन बाबतीत सर्वांची चर्चा करून मोलाची मार्गदर्शन केले.
तसेच संमेलन अध्यक्ष, उद्घाटक, स्वागत अध्यक्ष, तसेच विविध सत्रांचे अध्यक्ष, उद्घाटक, तथा प्रमुख अतिथी व प्रस्तावित निमंत्रित व पाहुणे या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सदरील बैठकीस दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवत, सामाजिक कार्यकर्ते संजय सोनकांबळे, अंकुश पडघान बोरगाव काकडे चिखली हे उपस्थित होते.





Social Plugin