Ticker

6/recent/ticker-posts

तो फेकला मुदतबाह्य औषध साठा खासगी व्यक्तीचा



मालेगाव  प्रतिनिधी जावेद भवानीवाले 

बोराळा ते पिंपरी अवगन रोडवरील शेतात रिकाम्या औषध्यांच्या बॉटल ,औषधी फेकण्यात आल्या अश्या प्रकारची बातमी प्रसिद्ध झाली त्याबाबत बोराळा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी केलेल्या खुलाश्यात तो खासगी एम आर चा असल्याचे स्पष्ट केले आहे.

 काही वर्तमान पत्रामध्ये बोराळा उपकेंद्र परिसरातील बोराळा ते पिंपरी अवगन रोडवरील शेतात रिकाम्या औषध्यांच्या बॉटल , औषधी साठा फेकण्यात आल्या अश्या प्रकारची बातमी प्रसिद्ध झाली आणि हा औषधी साठा बोराळा उपकेंद्राचा आहे असे नमूद करण्यात आले. परंतु हा औषधी साठा बोराळा उपकेंद्राचा नसून ज्या शेतामध्ये औषधी साठा फेकण्यात आला त्या शेतकरी भानुदास बाऊदणकर राहणार सोयता ता. वाशीम जिल्हा वाशीम यांचे कडे आम्ही स्वतः चौकशी केली असता त्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याचा मुलगा हा एम.आर. ( MAPRA) pvt.ltd. मध्ये आणि औषधासाठा मुदतबाह्य झाल्यामुळे तो बोराळा ते पिंपरी अवगण रोड वरील आमच्या शेतात, रस्त्याच्या कडेला आम्ही स्वतः फेकला असे सांगितले. तरी हा फेकलेला औषध साठा बोराळा उपकेंद्राचा नसून खाजगी औषध साठा आहे. असे डॉ.ज्ञानेश्वर उखळे यांनी ज्यांच्या शेतामध्ये मेडिसिन सापडली होती त्यांची चौकशी करून खुलासा केला आहे आणि तसा अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पाठविल्याचे एका कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनी वरून आमचे तालुका प्रतिनिधीला सांगितले आहे.