Ticker

6/recent/ticker-posts

पैठण मध्ये ९.जानेवारी रोजी बीड आणि परभणी निर्गुण हत्याप्रकरणी न्याय हक्कासाठी महामोर्चा



पैठण प्रतिनिधी. सत्यजित घोडके.

 बीड जिल्ह्यातील मसाजोगचे  सरपंच कै. संतोष भैया देशमुख आणि परभणी येथील कै. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्यायाच्या  मागणीसाठी पैठण तालुक्याच्या वतीने पैठण शहरात ०९.जानेवारी महामोर्चा चे आयोजन करण्यात आलेले आहे.

 पैठण तालुक्यातील सर्वपक्षीय विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व सकल समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैठक महामोर्चा चे आयोजन केले ग्रामीण भागातील  शेवगाव अहमदनगर जालना गेवराई बीड जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित राहणार आहे कै. दिगंबर कावसनकर स्टेडियम पासून सकाळी ९:३० वाजता होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल प्रमुख उपस्थिती संभाजी राजे भोसले.,मराठा आरक्षण युद्ध मनोज दादा जरांगे पाटील , आमदार सुरेश धस, संभाजीनगरचे खासदार संदिपान पाटील भुमरे  ,आमदार संदीप शिरसागर ,ऑल इंडिया पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार ,विनोद पाटील., कै. संदीप भैया देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील