मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी : आज दि :05 फेब्रु 2025 रोजी अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.अकोला बँकेला 116 वर्ष पूर्ण 117व्या वर्षात पदार्पण झाल्यानिमित्तUNO ने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारवर्ष घोषित केल्यामुळे मेडशी येथील बँक शाखेने कडून ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्यामध्ये बँकेचे निरीक्षक प्रवीण वऱ्हाडे. यांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता व ऑनलाईन व्यवहार हाताळताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घ्यावयाची दक्षते बाबत मार्गदर्शन केले.
बँकेचे शाखाधिकारी श्री अजय जाधव यांनी बँकेच्या विविध योजना बाबत माहिती दिली. या मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून मेडशी ग्रामपंचायतचे युवा सरपंच शेख.जमीर शेख गणीभाई , प्रमुख अतिथी संजयराव नारायणराव घुगे,प्रकाशराव सानप,शिवरामजी शेंडे. कुंडलिक पांडे. बँकेचे रोखपाल श्री विनोद खुळे.बँकेचे शिपाई श्री संतोष साठे.गट सचिव श्री एस एल शेख. श्री गणेश ठाकरे. श्री जगदीश बहादुरे. श्री विकास मुंठे सेवा सहसंस्थेचे अध्यक्ष व गावातील पत्रकार बांधव तंटामुक्त अध्यक्ष व बँकेचे सन्माननीय खातेदार व बँकेचे सहकारी मित्र श्री संतोष तायडे श्री वैभव साठे व वाचमेन संतोष तायडे यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडण्यात आले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन कुमारी समीक्षा बोरसे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी पूजा इंगळे यांनी केले
3 Attachments





Social Plugin