Ticker

6/recent/ticker-posts

महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य बद्दल परिसेविका संघा राऊत सम्मानित



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधि

ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमांत उत्कृष्ट सेवा देणारे वाशिम जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील महीला कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सम्मानित करण्यात आले. त्यामध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिसेविका (इन्चार्ज सिस्टर) संघा राऊत यांना वाशिम जिल्हाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे आणि भुलतज्ञ डॉक्टर अविनाश झरे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य बद्दल प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले, परिसेविका (इन्चार्ज सिस्टर) संघा राऊत मागील अनेक दिवसांपासून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत, कार्याला सेवा समजणारे परिसेविका संघा राऊत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना अतिशय चांगल्या पद्धतीने वागणुक देत असल्याने

रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण त्यांचे नातेवाईक परिसेविका संघा राऊत यांच्या कार्यालयावर समाधानी आहे. त्यांच्या कार्याची दखल जिल्हास्तरावर घेऊन सम्मानित केल्यामुळे त्यांना उत्कृष्ठ कार्य करण्यासाठी आणखी उर्जा मिळेल असे मत रुग्णालयात भर्ती असलेले रुग्णांनी व्यक्त केले, संघा राऊत यांची प्रतिक्रिया आमच्या प्रतीनिधीने घेतली असता त्यांनी असे सांगितले की मी माझे कार्य सेवा म्हणून करत असतांनी मार्गदर्शन कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साळुंखे तसेच वैद्यकीय अधिकारी व सहकारी यांचे मिळते