Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे जागतिक महिला दिना निमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा --



बचत गटाद्वारे महिला व्यावसायिक होत आहे महिला दिनाच्या निमित्त हि आनंदाची पर्वणी - तेजस्विनी डहाके


गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

                                                             

 कारंजा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ,पुरस्कृत अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्र च्या वतीने वतीने ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त महिला मेळावा व बचत गटाद्वारे उत्पादित वस्तू चे प्रदर्शनी व विक्री महोस्तवाचे आयोजन करण्यात आले . बचत गटाद्वारे आपल्या महिला घराचा उंबरा ओलांडून उधोग व्यवसाय करीत आहे हि महिला दिनाचे यश असून हि आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन आपल्या उद्घाटनीय मार्गदर्शनात मा.तेजस्विनी डहाके ,सामाजिक कार्यकर्त्या यांनी केले. 

महिला आर्थिक विकास महामंडळ,पुरस्कृत अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्र च्या वतीने वतीने ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त महिला मेळावा व बचत गटाद्वारे उत्पादित वस्तू चे प्रदर्शनी व विक्री महोस्तवाचे आयोजन करून बचत गटातील महिलांना व्यवसायिक प्रेरणा निर्माण करीत असून व्यवसायिक व्यासपीठ मिळवून देण्यास मोठी भूमिका बजावत आहे. माविम च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने महिला सक्षमीकरण च्या प्रक्रियेतील प्रत्येक महिलेला स्वबळावर उभे करण्याचा माविम चा उद्देश प्रदर्शनातील उधोजक महिला व गट यांच्याशी बोलताना पूर्ण होताना दिसून येतो हि निश्चितच आमच्या साठी आनंदाची बाब आहे. असे प्रतिपादन श्री राजेश नागपुरे,जिल्हा समन्वय अधिकारी माविम वाशीम यांनी केले .

 सदरील महिला मेळावा अंतर्गत उपसंचालक पर्यटन विभाग प्रादेशिक कार्यालय अमरावती श्री विजय अवधाने , यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना आई पर्यटन धोरणाबाबत माहिती देवून१० लाख रु पर्यंत कर्ज पुरवठा उपलब्ध असून पर्यटन विभागाच्या योजनाचा लाभ घेण्याबाबत आव्हाहन केले ..

महिला मेळावा कार्यक्रम अतर्गत सौ मंजुषा ठाकरे नामवंत महिला सन्मान पुरस्कार व सौ.छाया ग.गावंडे यांना यशस्वी उधोजक महिला सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र ,बँक ऑफ बडोदा,बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक,मा.उज्वला काळे,प्रकल्प अधिकारी पर्यटन विभाग ,मा.त्रीशुला घ्यार,सहा.जिल्हा समन्वय अधिकारी,मा.प्रांजली वसाके कार्यक्रम अधिकारी माविम वाशीम यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले 

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अल्पसंख्यांक cmrc च्या सर्व कर्मचारी ,संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले