![]() |
फोटो: आरोपी बाळू बुधावले
बुध दि [.प्रकाश राजेघाटगे ]
पूर्व वैमनस्यातून बुधावलेवाडी येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्यास वडूज येथिल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या युवकाचा दि.24/04/2020 रोजी 16:30 वाजता रा. बुधावलेवाडी पोस्ट - विसापूर ता.खटाव गावचे हद्दीत खिंड नावाचे शिवारातील कोकाटे तलाव्याजवळ दगडाने ठेचून खून केला होता.या बाबतच्या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी आपसात संगणमत करून मौजे बुधावलेवाडी ता. खटाव गावचे हद्दीत खिंड नावचे शिवारात कोकाटे तलावाजवळ जाऊन सदर ठिकाणी मयत नामे हिम्मत देवबा बुधावले व नातेवाईक प्रकाश महादेव मदने असे मासे पकडण्यासाठी तलाव्यामध्ये जाळे टाकून मयत हिम्मत हा पाण्यातून बाहेर येत असतानाच आरोपी क्रमांक 1) बाळू गजानन बुधावले, 2) संजय गजानन बुधवले, 3) गजानन संभाजी बुधावले, 4) अमित नानासो बुधावले, 5) सुरज नाना बुधावले यांनी जुने भांडणाचे कारणावरून मयत हिम्मत यास धक्काबुक्की करून खाली पाडले व आरोपी सुरज नानासो बुधावले व संजय बुधावले यांनी साक्षीदार प्रकाश मदने यास दगड फेकून मारले व त्यास घटनास्थळावरून पळून जाण्यास भाग पाडले व त्यानंतर आरोपी नामे बाळू गजानन बुधावले व अमित बुधावले यांनी मयत हिम्मत यास तलाव्याच्या पाण्यातून ओढून बाहेर काढून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले. त्यावेळी आरोपी नामे संजय बुधावले, गजानन बुधावले यांनी मयत हिम्मत याचे पाय धरले व आरोपी अमित बुधावले याने मयत हिम्मत याचे दोन्ही हात धरले त्यावेळी मयत हिम्मत हे मोठ्याने ओरडून मला सोडा, मला मारू नका असे म्हणत असताना आरोपी नामे बाळू गजानन बुधावले यांनी मोठा दगड व सुरज बुधावले याने तेथे पडलेला लहान दगड उचलून मयत हिम्मत याचे डोकीत व तोंडावर मारला त्याचवेळी आरोपी संजय बुधावले , गजानन बुधवले , अमित बुधावले यांनीही तेथे पडलेले दगड उचलून मयत हिम्मत याच्या अंगावर मारून त्यास जखमी करून त्याला निर्दयतेने , क्रूरतेने दगडाने ठेचून ठार मारले आहे. म्हणून वगैरे मजकुराचे खबरी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यात श्री.व्ही.बी.घोडके स.पो.नि पुसेगाव पो.स्टे. यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध मा.जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्री. अजित प्रताप कदम (साबळे) यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 15 साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो श्री.एन.एस.कोलेसो यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम 302 अन्वये दोषी ठरवून आज दि.10/03/2025 रोजी आरोपी - बाळू गजानन बुधावले वय - 40 वर्ष रा. बुधावलेवाडी पोस्ट - विसापूर ता.खटाव जि.सातारा याला
*भा.द.वि.स कलम 302 अन्वये जन्मठेप व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद* अशी शिक्षा सुनावली. सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी मा. सोनाली कदम, स.पो.नि. मा.श्री. संदीप पोमन यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पो.उप. नि.दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. 2086 विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ.585 सागर सजगणे, पो.कॉ. 2414 जयवंत शिंदे, पो. कॉ. 292 अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.





Social Plugin