Ticker

6/recent/ticker-posts

दिल्ली येथे संतोष पाटील यांना उक्तृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान



 देगलूर: तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी गावचे सरपंच संतोष पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतभूषण उत्कृष्ट सरपंच २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला होऊन काल रविवारी 9 मार्च रोजी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

काल.रविवारी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मधील भव्य सभागृहात सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या गावात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामांची दखल घेऊन दि.९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,यावेळी लोकसभा खासदार बळवंत वानखडे,माजी राज्यपाल कमलताई गवई आदी उपस्थित होते.

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अतिथी म्हणून तालुक्यातील येरगी गावचे सरपंच संतोष पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांमधील

सरपंच संतोष पाटील यांनी विविध उपक्रम राबवत आदर्श व उपक्रमशील ग्रामपंचायत बनवली आहे. त्यांच्या संकल्पनेतून गावातील पुढची पिढी सजग, सक्षम,निर्व्यसनी निरोगी व सज्ञान बनवण्याच्या दृष्टीने तसेच बालिका पंचायत राज व इतर मुली,युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देत त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी केलेले प्रयत्न,गावात स्वच्छता अबाधित राहण्यासाठी आजतागायत चालू असलेले कार्य,गावाला स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी चे कार्य अशा विभिन्न कार्यामुळे संतोष पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संतोष पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे देगलूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.