मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगांव -ता 29.मालेगांव शहरातील मालेगाव -केळी रस्त्यावरील श्री तुळजाभवानी मन्दिरातील श्री तुळजाभवानी देवीची मूर्ति स्वयंभू आहे .श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे . मंदिराच्या कळसाची उंची 31 फुट आहे . मन्दिरातील गर्भगृह श्री क्षेत्र तुळजापुर येथिल गर्भगृहा प्रमाणे आहे . गर्भगृहामध्ये देविवाहन सिंहाचि मूर्ति कोरलेली आहे . मंदिरासमोर बाराही महीने पाणी असलेली विहीर आहे . मंदिरामध्ये श्री संतोषी मातेची मूर्ति तर मंदिरासमोर आसरामातेच्या मूर्ती आहेत .मंदिरालगत श्री संत गजानन महाराज व श्री विठ्ठल रुख्मीनि व् शिव मंदिर आहे .मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मीनि ,श्री गणेश ,श्री शंकर,श्री निलनाग ,श्री हनुमान , शिववाहन नंदी यांच्या मूर्ति स्थापन केलेल्या आहेत .
मंदिरासमोर सभामंडप आहे .हे मंदिर स्व . तुळजाराम गाभणे यांनी बांधले आहे . मंदिरात सकाळी सर्योदयाच्या वेळी व् सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आरती होते .दर मंगळवारि ,पोर्णिमेला व् नवरात्रामध्ये भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येतात .नवरात्रानिमित्त मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे .मालेगांव केळी रस्त्यावर मालेगाव शहरालगत हे मंदिर आहे .संस्थानवर विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे ..मंदीरालगत मालेगाव लघु पाटबंधारे योजनेचा तलाव आहे .
बॉक्स -श्री तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर येथिल गर्भगृह पाहुन श्री तुळजापुर येथिल गर्भगृहाची आठवण होते . मन प्रसन्न होते असे ह.भ.प.सेवाराम महाराज म्हणाले .





Social Plugin