पालघर - ग्रामीण प्रतिनिधी धनेश क्षीरसागर
पालघर, दि. 28-: शासकीय सेवा करताना सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना एक दिवस सेवानिवृत्त व्हावेच लागते.पण जनतेची मनाभावातून सेवा करणारे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीसाठी निरोप देणे दुःखद असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे नियत वयोमानानुसार 31 मार्च 2025 रोजी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री.नाईक बोलत होते.
यावेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार राजन नाईक आमदार विनोद निकोले, कोकण विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे , सहायक जिल्हाधिकारी करिष्मा नायक , सत्यम गांधी , वसई- विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. हेरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, आणि अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या पत्नी अनुसयाताई बोडके, बेंगलोर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले त्यांचे चिरंजीव दिग्विजय बोडके, त्यांचे दुसरे चिरंजीव मयुरेश बोडके तसेच त्यांचे नातेवाईक आणि स्नेही उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले की, या शासकीय जनता दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात निवेदन आले इतक्या मोठया प्रमाणात त्याचा निपटारा हि होऊन समस्या निपटारा केलेले पत्र देखील संबंधित अर्जदार यांना देण्यात आले. या सगळ्या प्रक्रियांचे सूक्ष्म नियोजन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले होते. या जनता दरबारा मध्ये 842 अर्ज प्राप्त झाले तर 622 निकाली निघाले जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे हे यश आहे, असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्यचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
प्रशासनामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी एखादा अधिकारी निधड्या छातीने जातो आणि जिल्ह्यातील जनता हे आपले कुटुंबच समजून त्यांची समस्या सोडवण्यासाठी मानलावून काम करतो अशा अधिकाऱ्यांच सेवानिवृत होणं हे दुःखदायक असत. . वाढवण पोर्टमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील या दोन्ही अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. यश येणारच आहे. पोर्ट पण बनेल आणि एअरपोर्ट पण बनेल. त्या परिसराच्या जनतेच्या मनामधील नैराश्यची भावना आशावादी होईल आणि तिथला प्रत्येक तरुण रोजगारला लागेल असा विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला
श्री. बोडके यांच्याबद्दल सांगायचे तर ज्यावेळेला वाढवण बंदराला जनतेचा विरोध होता. त्या परिस्थितीमध्ये सगळयांचे मन वळवण्याचा, त्यांच्या भावना समजून घेऊन, पुढील वातावरण व्यवस्थित करणे हे काम जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अधिकारी आणि कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आपल्या भावनाला वक्त केल्या.





Social Plugin