▪️ ज्वारीचे पीक जोमात , कामगारांचा तुडवडा▪️ ज्वारीला चांगला दर मिळणार
बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख हंगाम घेण्यात येतात . खरीपात बाजरी तर रब्बीत ज्वारी हे मुख्य पीक असते. खटाव , माण , फलटण तालुक्यात ज्वारीचे सार्वाधिक क्षेत्र राहते. खटाव तालुक्यात ज्वारीचे पीक जोमात असून वडूजसह सातेवाडी पेडगाव , मांडवे , तडवळे , गुरसाळे , उंबर्डे , सि. कुरोली , गणेशवाडी , हिंगणे , निमसोड , पुसेसावळी , पुसेगाव , बुध ,खटाव , भुरकवडी , निढळ , खातवळ , एनकूळ ज्वारीचे पीक काढणीस कमी जास्त प्रमाणात सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात वाढलेली थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण झाले . त्यामुळे ज्वारीच्या निसावलेल्या कणसामध्ये टपोरे दाणे भरले आहेत .
कायम दुष्काळी भाग म्हणून गणल्या गेलेल्या खटाव तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस पडला आहे . तसेच गेल्या महिन्यात वाढलेली थंडी व आता उष्णता या पोषक वातावरणामुळे ज्वारीचे पीक बहरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे . जनावरांच्या चाऱ्या बाबतचा थोड्याफार प्रमाणात प्रश्न मार्गी लागणार आहे. परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे .
रब्बी हंगामात ज्वारीचे पीक नेहमीच जास्त प्रमाणात घेतले जाते . तसेच यंदा हवामान चांगले असल्याने उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे . शेतकरी रात्रंदिवस शेतात जाऊन ज्वारीची कापणी करीत आहेत . उन्हामुळे सकाळ , संध्याकाळ , रात्री शेतकरी ज्वारी काढणी व कापणी कामात व्यस्त आहेत . तालुक्यात अंदाजे २१ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे .सध्या मोत्या प्रमाणे शुभ्र असणाऱ्या ज्वारीला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे . तर आरोग्याला उपयुक्त म्हणून ज्वारीला वर्षभरही मागणी असते. तसेच वैरणीला चांगला दर मिळत आहे तसेच यंदाही ज्वारीच्या पिकास चांगला दर मिळेल अशी आशा शेतकरी वर्गाला लागलेली आहे. ज्वारी काढणीचा हंगाम अंतिम टप्यात आला असून शेतकरी वर्ग ज्वारीला शेवटचे पाणी देण्यात मग्न आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना लाईटचे टाईम टेबल बघून पाणी दयावे लागत आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यापाण्याचे टाईम टेबल नीट नाही . विजपुरवठा पुर्ण क्षमतेने होत नाही. शेतकऱ्यांच्या मोटर निट चालत नाही त्यामुळे पिके वाळू लागली आहेत .महवितरणने पाण्याचे टाईम टेबल रात्री न ठेवता दिवसा ठेवावे. पाण्यामुळे शेतकर्यांची दयनीय अवस्था होत आहे .
यंदा ज्वारी काढणीचा दर गगनाला भिडले आहेत . अंदाजे दहा ते अकरा हजार रुपये एकरी साठी मोजावे लागत आहेत . कडब्याचा दर एका पेडींला शंभर रुपयेच्या दरम्यान आहे तर शेकडा पेंडींचा दर अडीच ते तीन , साडेतीन हजारांपर्यंत राहण्याची शक्यता आहे . ज्वारी काढणी कामगारांचा दर पुरुषांना पाचशे ते सहाशे तर स्त्रियांना साडेतीनशे ते चारशे रुपये राहण्याची शक्यता आहे . तसेच कडबा बांधणीचा दर पेंडीला ४ रुपये तर डबल बांधणीला ५ रुपये असे शेतकरी सांगत आहेत. मळणीला पोत्याचा दर दीडशे ते दोनशे रुपये राहण्याची शक्यता आहे . ज्वारीच्या चांगल्या प्रतीच्या ज्वारीला ३५०० ते ४००० दर मिळेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे .





Social Plugin