Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रसमूह वर्धनगडचा बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

  केंद्रसमूह वर्धनगडचा बालआनंद मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वर्धनगड येथे मोठ्या उत्साहात आनंदात साजरा झाला. सकाळी१०.३० वा उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी कोरेगाव खटावचे  आमदार श्री. महेशजी शिंदे  यांच्या सौभाग्यवती  डॉ.सौ.प्रियाताई शिंदे ,  श्री अर्जुन मोहिते मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सरपंच वर्धनगड, मा.सौ.सोनाली विभुते गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खटाव 

सौ. संगीता गायकवाड मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी बीट- बुध  ,  श्री.चंद्रकांत सुतार  साहेब शिक्षण विस्तार अधिकारी  बीट- औंध पुसेसावळी,माजी   केंद्रप्रमुख श्री प्रमोद जगदाळे साहेब व छाया जगदाळे मॅडम, केंद्रप्रमुख श्री. खोत साहेब श्री. पवार साहेब श्री. निकाळजे साहेब  श्री.दिडके साहेब,सौ.निता पवार मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वर्धनगड. श्री गणेश जठार, पोलिस  पाटील, श्री.संजय घोरपडे श्री.उमेश चव्हाण,  श्री. रोहन पाचांगणे, सर्व शाळांचे अध्यक्ष सदस्य,पालक शाळा व्यवस्थापन समिती केंद्र समूह वर्धनगड, केंद्रप्रमुख मा. श्री नवनाथ गावडे साहेब वर्धनगड केंद्रसमुहतील मुख्याध्यापक सौ सीमा कदम, श्री राजेंद्र कर्पे सर, सौ.चव्हाण मॅडम व सर्व शिक्षक केंद्र समूह वर्धनगड उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्यासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळा वर्धनगडच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आलेला होता सुंदर अशी साऊंड सिस्टिम व्यवस्था, विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांसाठी भोजन व्यवस्था केलेली होती.

केंद्र समूहातील वर्धनगड, पाचांगणेआळी,नेर, शिंपीमळा, पवारवाडी, मदनेवस्ती, फडतरवाडी नेर, नागनाथवाडी, भवानीनगर,  पुसेगाव नंबर १,  चव्हाणवाडी, बेघरवस्ती पुसेगाव  या १२ शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला संगीत खुर्ची चमचा लिंबू इत्यादी मनोरंजनात्मक स्पर्धा बाल आनंद मेळाव्यात पार पडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. नवनाथ गावडे साहेब यांनी केले. मा.डॉ .सौ.प्रियाताई शिंदे मॅडम यांनी बाल आनंद मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव त्याच बरोबर बदलत्या परिस्थितीत विद्यार्थी शाळा यांना कोणते बदल स्वीकारावे लागतील तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळा सीबीएससी पॅटर्न झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट नक्कीच वाढेल अशी आशा व्यक्त केली. दुपार सत्रात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे कलाविष्कार सादर केले या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी बाल आनंद मेळाव्यास भेटी दिल्या.कोरेगाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री अरुण घोरपडे यांचे सहकारी श्री सचिन बोराटे सर शिक्षक बँकेचे माजी चेअरमन , श्री नवनाथ जाधव मा.  व्हाईस चेअरमन श्री. शशिकांत सोनवलकर सर  शिक्षक संघ व समिती यांचे विविध पदाधिकारी, केंद्रसमूहातील सर्व पालक ग्रामस्थ,परिसरातील शाळांमधील शिक्षक यांनी भेटी दिल्या. बाल आनंद मेळाव्यात वर्षभरात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थी व शाळा यांचा गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कृष्णात फडतरे सर, श्री. जीवन सावंत सर, श्री. किरण अहिवळे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्री. विक्रम कुंभार सर यांनी मानले.