अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्ट,अंबड (रजिस्ट्रेशन नंबर E-619 (ग)) यांच्या वतीने नेहमीप्रमाणे खीरदान व भोजनदान करून पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. तथागत भगवान बुद्ध,महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता,न्याय आणि नीती यांच्या विचारधारेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कालकथित आण्णासाहेब राणुजी खरात यांनी सुरू केलेली धम्मचळवळ धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्ट पुढे नेत आहे.
पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवार 13-03-2025 रोजी दुपारी 12:45 वाजता पूज्य भंते यांच्या हस्ते पूजा, वंदना व परित्राण पाठ झाला.यावेळी थायलंड चे पूज्य भंते बुनली महास्थवीर,भंते अनन महाथेरो,भंते खमसिंग व भंते राजरत्न यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ची पूजा केली.
त्यानंतर खीरदान व भोजनदान करण्यात आले.आयु सिंधु गोविंद खरात आणि आयु गोविंद खरात (डिजिटल मीडिया,तालुका अध्यक्ष) यांनी या पौर्णिमा निमित्त हे खीर दान व भोजनदान ठेवले होत.या निमित्ताने परिसरातील उपासक-उपासिकांनी या पवित्र सोहळ्यास मोठया प्रमाणावर उपस्थीत होती.





Social Plugin