Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात वाहनाच्या कट मुळे दुचाकी चालक जागीच ठार



गुणवंत राठोड कारंजा लाड (प्रतिनीधी) 

दिनांक ११/३/२५ प्राप्त माहितीनुसार कारंजा ते अमरावती रोडवर देवळे यांचे नायरा पेट्रोल पंपा जवळ अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे दुचाकी चालक जागी ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली. अपघाताची माहिती अजय थेर यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख त्यांनी तात्काळ समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक श्याम घोडेस्वार यांना दिली. ते तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी टू व्हीलर चालक याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले असता. 

येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. अपघातात मृत्यू झालेल्या -चालकाचे नाव भूषण महादेव कुन्हाडे वय २५ रा पोहा हे असे आहे. मदतीसाठी बाळू राठोड अनिकेत भेलांडे तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशन कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी हजर होते. अपघात हा कशामुळे झाला याचे अद्याप कारण समजू शकले नाही. पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन करीत आहे.