प्रतिनिधी: प्रदिप गिरी
बोरगांव ता. हदगांव या गावात दोन विवाह सोहळे होते लग्न सोहळ्याची गावात तयारी सुरू होती दि 19 एप्रिल रोजी रात्री तरुण मदतीस आले होते यात काही युवक मंडप टाकण्याचे काम करत होते यावेळी वाऱ्याच्या झोका आल्यामुळे मंडपाच्या वरून जाणारी गावातील मेन डीपी ची निवघा येथून येणारी 33 kv च्या तारेला मंडपाच्या खांबाचा स्पर्श झाला यात विजेचा जोरदार शॉक लागून सख्खे चुलत भाऊ असले पांडुरंग भट्टेवाड आणि साईनाथ भट्टेवाड, हे दोघे जण दुर्दैवी शॉक लागून अपघाती मृत्यूमुखी पडले. तर एक गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली
Social Plugin