बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
रहाटणी ता . खटाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी सुमेध उमेश थोरात याने विविध स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. त्याने NSSE परीक्षेत 200 पैकी 188गुण मिळवत राज्यात सातवा क्रमांक मिळविला तसेच मंथन परीक्षेत. 150 पैकी 138 गुण मिळवत राज्यात सातवा क्रमांक तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.अभिरूप परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवत जिल्ह्यात तृतीय क्रमांक आणि I Am Winner परीक्षेत 150 पैकी 128 गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
त्याला वर्गशिक्षिका सौ आराधना गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. रहाटणी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. त्याच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते , शिक्षण विस्तार अधिकारी संगिता गायकवाड , चंद्रकांत सुतार ,शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गावचे सरपंच यांनी त्याचे अभिनंदन केले.





Social Plugin