बिलोली प्रतिनिधी.
बिलोली तालुक्यातील खपराळा येथील दलित वस्तीतील होत असलेल्या सीसी रोड व नाली बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मागणी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पांडुरंग पाटील बोगरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली होती. अन्यथा दिनांक सात एप्रिल पासून ग्रामपंचायत कार्यालय खपराळा येथे उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. होत असलेले बोगस काम थांबवण्यात आले नसल्यामुळे बोगरे हे उपोषणास बसले असून, त्यांचा उपोषणाचा रविवारी पहिला दिवस होता. याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे डीप्ती इंजिनियर यांचा हेतू पुरस्पर्पणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. बिलोली तालुक्यातील 16 लक्ष रुपयांचे सीसी रोड व नाली बांधकामासाठी दलित वस्तीत मंजूर झाले सदर कामाची सुरुवात ही झाली असून कामाचे बोगसपणा उघडपणे दिसून येत आहे.
यात सिमेंट एकदम हलक्या दर्जाचे वापरण्यात येत आहे. तर वाळू केवळ दोन किलोमीटर अंतरावर मिळत असताना डस्ट चा वापर होत आहे. त्यासोबतच गजाळी 8 इंच न वापरता 6 इंच गजाळी वापरण्यात येत आहे. रोडवर बेड न टाकता पूर्वी केलेल्या रोडवरच थातूरमातूर गिट्टी टाकून सिमेंट टाकल्या जात आहे. हा बोगसपणा थांबवण्यासाठी मागणी गावातील 78 वर्षे बुजुर्ग व्यक्ती पांडुरंग पाटील बोगरे यांनी केली होती. परंतु अधिकाऱ्यात मिली भगत असल्याने यात जिल्हा परिषदेचे डीपटी इंजिनियर पंचायत समितीचे जीई, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचा समावेश असल्याचा आरोप होत आहे. सदर नालीचे काम पूर्ण होत आले असून सीसी रोडचे अर्ध्यापर्यंत काम झालेले आहे. उपोषणाचा हा पहिला दिवस असून अधिकारी याकडे फिरकण्यास तयार नसल्याने या उपोषण करता वयस्कर असल्याने अधिकारी लक्ष देण्याची गरज आहे.





Social Plugin