Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अल्टीमेटम.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील कठडे नसलेल्या एक किंवा दोन फूट उंच कठडा असलेल्या विहिरींच्या मालकांनी एक महिन्याच्या आत विहिरींना सुरक्षा कठडे करून घ्यावेत. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार संबंधित विहिरींच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी काढले आहेत. अलीकडेच नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारामध्ये मोठी अपघाती दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासन सतर्क आहे.