Ticker

6/recent/ticker-posts

महसूल कर्मचाऱ्यांनी दुसराबीड येथे रात्री अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जप्त



 [ पथक नेमुन‌ सुद्धा दररोज सकाळी राहेरी बु, ताडशिवणीतुन रेती उपसा चालतो ... रेती माफियांना चपराक बसेल का ..? ]


सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- तालुक्यातील हिवरखेड पूर्णा निमगाव वायाळ ,तढेगाव, दुसरबीड, ताडशिवणी,या गावांमध्ये अवैध रेती उत्खननाबाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या त्या अनुषंगाने महसूल कर्मचाऱ्यांनी आणि तहसीलदार यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना धडा शिकवण चालू केला आहे त्यामुळे आता सिंदखेडराजा तालुक्यामध्ये शंभर टक्के रेतीला  चाप बसले का आशी चर्चा होत आहे

प्रवीण कुमार वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली 16/04/2025 रोजी कारवाईचा इशारा दिला होता नंतर आज वरील कार्यवाही करताना ग्राम महसूल अधिकारी जी एम पवार हिवरखेड ,व्ही .बी.थोरात ग्राम महसूल अधिकारी दुसरबीड, व्हि.ए.जायभाये ग्राम महसुल अधिकारी जऊळका वरील पथकांनी कारवाई केली आहे 24 तास रोडवर असून कुठल्या प्रकारचे टिप्पर आढळल्यावर  कारवाई होणार त्यामुळे आता रेतीया माफियांची धावपळ वाढली आहे..