ग्रामस्थांच्या सहकार्यान श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- तालुक्यातील राहेरी बु , गावामध्ये दि.19 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत हरिनाम सप्ताह सोहळा प्रारंभ आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, संत नगरी राहेरी बु गावामध्ये श्री रूख्मिनी पांडुरंगाच्या कृपेने, श्री संत दुनियादास महाराज, श्री संत वै. नारायण गुरूजी,श्री संत वै. आंबादास महाराज यांच्या आशिर्वादाने ह.भ.प. श्री. प्रेमानंद महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यान श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
बस स्टॅण्ड वरिल शिव उधान येथे सप्ताह सोहळा 19 एप्रिल पासून सुरू होणार असुन या सप्ताह काळात दैनंदिन सकाळची काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा दिनक्रम आहे. सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने पंचक्रोशीतील परिसरात भक्तिमय वातावरण
तरी पंचक्रोशीतील सर्वानी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
.jpg)




Social Plugin