Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत कार्यालय अंचरवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



संजय गवई अंचरवाडी.

ग्राम पंचायत कार्यालय अंचरवाडी येथे सरपंच सौ कोकिळा ताई समाधान परिहार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ज्ञानेश्वर परीहार व तेजराव गवई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर तसेच त्यांनी केलेल्या कार्यावर भाषण केले.

कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठीत नागरिक एकनाथ बाबा परिहार समाधान पाटील सुनील परिहार, रामचंद्र शिंदे, गणेश राणा परिहार सुगदेव गवई, इंदरसिंग परिहार, शाम राठोड ज्ञानेश्वर चव्हाण, संजू सरपंच तसेच गावातील बरीच मंडळी हजर होती.

तसेच वैशाली बुद्ध बिहारमध्ये सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा घेण्यात आली व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे वतीने व गावातील सर्व समाज बांधव यांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली व जयंती शांततेत पार पडली.