Ticker

6/recent/ticker-posts

घाई घाईत चालू केलेल्या ओव्हरब्रिज वर साइट पट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे



पालघर २१ एप्रिल(ज्ञानेश चौधरी)

 नवीन रेल्वे मालवाहतूक चालू करण्यासाठी सफाळे येथे नवीनच रेल्वे उड्डाणपूल चालू करण्यात आला आहे.उड्डाणपुलाचे काम संथ गतीने चालू होते परंतु रेल्वे मंडळाने सफाळे येथील फाटक बंद करण्यासाठी मार्च २०२५ हा शेवटचा दिवस दिला होता .त्या अगोदर उड्डाणपूल चालू करण्यासाठी दिवस रात्र  घाईघाईत काम करून उड्डाणपूल चालू गेला गेला परंतु सगळीच कामे पूर्ण झाली नाहीत 

साइड पट्ट्या वर टाकलेला मुरुम रोलर ने वरवर दाबला गेला त्यामुळे आज रेल्वेचे काम करणारा गुजरात infrastructure चा मालवाहतूक करणारा आईवा साइट पट्ट्या वरून घसरून पलटी झाला. जिवित हानी झाली नसली तरी वित्त हानी झाली आहे.पालघर बांधकाम विभागाने लक्ष देऊन ब्रीज चे काम चागल्या रीतीने करावे असे लोकांचे म्हणणे आहे