बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]:
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातील विद्यार्थ्यांनी राजस्थान स्थापना दिवस व ओडीसा स्थापना दिवसानिमित्त दरबार हॉल राजभवन मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल भवन मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे विविध राज्यांच्या स्थापना दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यानुसार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी माननीय राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपस्थितीत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजस्थानातील आर्थिक सामाजिक विकासाबाबतची चित्रफीत दाखवण्यात आली त्याबरोबरच राजस्थान व ओडिसा राज्यातील लोककला प्रकाराचे सादरीकरण कर्मवीर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमात सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व लोकगीतांच्या माध्यमातून राजस्थान व ओडिशा राज्यांच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे या राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दोन्ही राज्यांचा इतिहास, सौंदर्य, वारसा, कला संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी लोकगीते केसरिया आणि झिरमीर बरसे आणि लोकनृत्य चिरामी, घूमर आणि कालबेलिया सादर केले. राजस्थानी राज्यगीत 'पधारो म्हारो देस' ने उपस्थितांची माने जिंकली. तसेच, ओडिशातील लोकगीते संबलपुरी गीत- 'रसरकेली बो' आणि लोकनृत्य - संभलपुरी ढलकाई सादर करण्यात आले.
कर्मवीर विद्यापीठ हे नवीन विद्यापीठ असले तरी या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थान स्थापना दिवस व ओडिसा स्थापना दिवसानिमित्त उत्तम सादरीकरण करून उपस्थित त्यांना उत्तम कलाप्रकारचे सादरीकरण केले यामधून भारतातील एकता व अखंडता निर्माण करण्याच्या अनुषंगाने तरुण पिढीमध्ये जाणीव व जागृती होत आहे असे मत माननीय राज्यपाल महोदय यांनी व्यक्त केले.
आगामी काळात प्रगतीची शिखरे सर करण्यासाठी देशात एकात्मता टिकून राहणे आवश्यक असून एकतेमुळे देशाचे जगातील स्थान उंचावले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राजस्थान व ओडिशा राज्यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात देखील महत्वाचे योगदान आहे. ओडिशाचे सुपुत्र शेलेंद्र यांनी इंडोनेशियातील जावा, सुमात्रा येथवर राज्यविस्तार केला होता. ओडिशात जन्मलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण होते असे सांगून एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमामुळे देशातील लोकांना इतर राज्यातील महान नेत्यांचे योगदान समजण्यास मदत होत आहे असे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी माननीय राज्यपाल यांचे प्रधान सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस रामामूर्ती, अवर सचिव श्री विकास कुलकर्णी विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री चंद्रकांत दळवी, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख सहसचिव (उच्च शिक्षण) प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडीट) प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे, माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री बी एन पवार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य श्री रामशेठ ठाकूर, श्री वाय टी देशमुख, विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी टी जाधव, प्रो डॉ. गणेश जाधव विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता डॉ अनिल वावरे, डॉ डीडी नामदास, डॉ टि. डी महानवर, प्रो. डॉ आर आर साळुंखे, संचालक डॉ हेमंत उमाप, वित्त व लेखाधिकारी डॉ धनाजी जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन व संचलन विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका प्रो. डॉ. मनीषा पाटील, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य प्रा रामराजे माने देशमुख, डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी केले.





Social Plugin