Ticker

6/recent/ticker-posts

बोईसर भाजी मार्केट च्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष



पालघर - पालघर ग्रामीण प्रतिनिधी धनेश क्षीरसागर 

बोईसर मधील भाजी मार्केट मधील मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात अधिकृत बांधकाम चालू आहे, यावर ग्रामपंचायत प्रशासना चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे ?  बोईसर भाजी मार्केट मध्ये रोज प्रचंड गर्दी होत असते  तिथे मुख्य रस्ता लगत अनधिकृत बांधकाम सुरू आहे बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकाने मार्केट रोडवर रेती खडी आणून टाकल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे.

तेथे दररोज टाकलेल्या रेती व खडी मुळे दुर्घटनाहून बाजारामध्ये खरीदारीसाठी आलेल्या काही नागरिक त्या रेती वर घसरून पडले व त्यांना दुखापत झाली आहे संबंधित प्रकरणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यासंबंधी ग्रामपंचायत बोईसर येथे तक्रार अर्ज दाखल करून सुद्धा स्थानिक प्रशासन यावर दुर्लक्ष करत आहे व व्यावसायिकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात का ?  तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे 

राज्यात चाललेल्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई दिसून येत आहे परंतु पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे प्रचंड अनधिकृत बांधकाम होत आहे यावर कार्यवाही कधी होणार असा प्रश्न निर्माण स्थानिक नागरिक करत आहेत.