Ticker

6/recent/ticker-posts

परमात्मा एक सेवा समिती तर्फे शालेय साहित्य वाटप



 खापा (तुमसर) : परमात्मा एक सेवा समिती तर्फे एक हात मदतीचा हा स्तुत्य उपक्रम नेहमी आयोजीत केला जातो, याचच अवचित्य साधुन मौजा सालेटेका (म.प्र.) येथे, वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग,कंपास,पाणी बॅाटल,ड्राईंग वही,नोटबुक,पेन,पेन्शील..ईत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. सेवा समिती सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असते, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजकार्याचे व व्यसनमुक्तीचा मंत्र समाजाला दिला.

 यांच्यात कार्याला पुढे नेण्यासाठी सेवा समिती सदैव धडपड करीत असते. एक हात मदतिचा या उपक्रमांतर्गत सेवा समिती गरजूंना मदत करणे,पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे, सेवा समिती खास करुन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असते. आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. भविष्यात सुध्दा सर्वाच्या सहकार्याने आपले कार्य असेच निरंतर सुरु ठेवनार असा निर्धार सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परमात्मा एक सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी तन,मन धनानी मदत केली