बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील सुकन्या संस्कृती प्रकाशन पुणेच्या प्रकाशक सुनीताराजे पवार यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाहपदी निवड झाली. याबद्दल श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने त्यांचा सन्मान केला.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात सत्काराचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, दिनेश फडतरे, मोहनराव गुरव, चंद्रकांत जाधव, सचिव विशाल माने आदी उपस्थित होते.
दरम्यान, अनेक सामाजिक, साहित्यिक संस्थांशी संलग्न राहून साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी आणि माय मराठीच्या सेवेसाठी आपले शंभर टक्के योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले.
Social Plugin