Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घडले राष्ट्रीय ऐक्याचे अभिनव दर्शन



गुलाबपुष्प देऊन बौद्ध बांधवांचे स्वागत तालुका पत्रकार संघाचा पुढाकार

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व इतर मान्यवरांतर्फे बौद्ध बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले . यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रीय ऐक्याचे अभिनव दर्शन घडले . याबाबत सविस्तर असे की सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , आरोग्य-विषयक तसेच इतर जनहिताच्या उपक्रमासह जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या दिग्रस तालुका पत्रकार संघातर्फे नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते . 

          दिग्रस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी पी पप्पूवाले , यशवंत सुर्वे-पाटील , दिग्रस पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण इंगोले , गोपाल शाह , फारूक अहेमद , मजहर अहेमद खान , अब्दुल रफीक शेख , आमीन चौहान , आसिफ काजी , फारूक चौहान , सादिक गारवे आदींनी स्थानिक कच्छी चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गुलाबपुष्प देऊन बौद्ध बांधवांचे स्वागत केले .दिग्रस येथील समता पर्व-२०२५ चे अध्यक्ष के टी जाधव , निवृत्त शिक्षणाधिकारी डॉ वाल्मिक इंगोले , निवृत्त तहसीलदार रवी तुपसुंदरे , संकल्प महासभेचे गौतम तुपसुंदरे , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे किशोर कदम , श्रीराम तायडे , संजय मुजमुले , श्याम काजळेसह बौद्ध समाजातील असंख्य बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .

          दिग्रस तालुका पत्रकार संघाच्या सदर उपक्रमामुळे राष्ट्रीय ऐक्याचे अभिनव तसेच कृतीपूर्ण दर्शन घडले . श्रीराम नवमी , शिवजयंती , हनुमान जयंती व इतर अनेक कार्यक्रमात पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच मुस्लीम समाजातील सुज्ञ मंडळीतर्फे दरवर्षी खिचडी , शरबत , पाणी वाटप करण्यात येते किंवा स्वागत करण्यात येते . त्यांच्यामुळे हिंदू-मुस्लीम तसेच राष्ट्रीय ऐक्य वाढण्यास मदत होते . सदर उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे .