Ticker

6/recent/ticker-posts

"कारागृहातील बंदी आणि फास्ट फूड कोर्स"



 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदी यांच्यासाठी दि .25 मार्च, ते 4 एप्रिल या कालावधीत "फास्ट फूड कोर्स"चे आयोजन करण्यात आले होते. एकूण 30 बंदयांचे प्रशिक्षणाचा कोर्स सुरू करत असताना यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुकुल माधव फाउंडेशन पुणे, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सातारा आणि सातारा जिल्हा कारागृह यांच्या सहयोगाने सदर 10 दिवसांचा फास्ट फूड कोर्स घेण्यात आला.

त्या फास्ट फूड कोर्समध्ये बंदयांना विविध खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये बटाटा भजी, कांदा भजी, पालक भजी, वडापाव, मिसळ, व्हेज-नॉनव्हेज हक्का नूडल्स, चायनीज भेळ, डोसा, पेय पदार्थांमध्ये मॉकटेल, व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी, उपवासाची खिचडी व साबुदाणे वडे असे विविध पदार्थ 10 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यकालामध्ये शिकवण्यात आले. 

कारागृहात विविध गुन्ह्यांच्या व कलमांच्या अंतर्गत बंदिस्त असलेल्या बंदयांचा वेळ सत्कर्मी लागावा या हेतूने तसेच कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य "सुधारणा व पुनर्वसन" याचा देखील हेतू साध्य व्हावा, यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके,  विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व पश्चिम विभाग पुणे येथील कारागृह उप महानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे  यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोर्सेस बंदयांना शिकवण्यासाठी आयोजन करण्यात आले होते.

सर्व बंदयांना आज रोजी 10 दिवसाच्या कोर्सचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास मुकुल माधव फाउंडेशनचे श्री संतोष शेलार, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे श्री विनोद जाधव, जिल्हा कौशल्य विकासचे प्रतिनिधी अमर माने तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे,  वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे,  सुभेदार मानसिंग बागल, शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत कदम, चांद पटेल, बालाजी मुंडे, काजल सायमोते तसेच इतर कर्मचारी हजर होते.