Ticker

6/recent/ticker-posts

धनज बु येथे विद्यार्थ्यांसाठी चाईल्ड लाईन समुपदेशन कार्यशाळा



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

कारंजा तालुका मधील धनज येथील तारांगण इंग्लिश स्कूल धनज बु|| आणि श्री मोहनलालजी भंसाळी विद्यालय धनज बु ह्यांच्या संयुक्त विद्यमाने विदयार्थ्यांसाठी चाईल्ड लाईन समुपदेशन कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते. सादर कार्यक्रमात बियोण्ड डिसअबिलिटीचे बाल लेखक विराज संदीप शिंदे, वाशीम ह्यांनी आपले अनुभव कथन केले. 

तसेच चाईल्ड लाईन चित्रफितीद्वारे मुलांना मनोरंजक पद्धतीने समुपदेशन केले. सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापिका वैशाली इंगळे, रोमा चौधरी, निमिता ठाकरे, पावसे, डहाके, निरगुडे उपस्थित होत्या. चाईल्ड लाईन आपल्याला कशा प्रकारे मदत करते आणि त्यासाठी चाईल्ड लाईन चा 1098 हेल्प लाईन नंबर कशा प्रकारे मार्गदर्शन करतो आणि प्रसंगी उपयोगी पडतो ह्याबाबतची सविस्तर माहिती विराज शिंदे ह्यांनी प्रस्तुत केली.