Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील एकमेव शिव छत्रपती मंदिर



ज्ञानेश चौधरी पालघर ग्रामीण वार्ताहर

भिवंडी मराडे पाडा येथे महाराष्ट्रातील पहिले शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे.. राजुभाऊ बारकू चौधरी यांच्या प्रयत्नाने बांधलेले ही मंदिर  शिव जयंती दिवशी  मा.देवेन्द्रजी फडणवीस आणि मा.एकनाथ शिंदे जी ह्यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले

मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळवा हया साठी परिसरात पेंटिंग च्या माध्यमातून भिंती वर चित्र काढली आहेत इतिहास कालीन शस्त्र सुद्धा ठेवली आहेतसुमारे ५ एकर परिसरात गडकिल्याचा प्रतिकात्मक रुप देऊन मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

मुंबई पासून सुमारे ७५किमी मुंबई नाशिक हायवे जवळ असणारे हे ठिकाण पुढील काळात नक्कीच एक पर्यटन स्थळ होईल या मध्ये शंकाच नाही. मुबई येथे येणाऱ्या लोकांनी एकदा भेट द्यावी व शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन करावे.